हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नांदेड इथं शासकीय रुग्णालयात झालेल्या प्रकारासंदर्भात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  नांदेडच्या  शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्ण दगावल्यानंतर आरोग्य यंत्रणेबाबत संताप व्यक्त करत  पाटील यांनी अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांना स्वच्छतागृह साफ  करायला लावल्याचा  काल व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाला. या घटनेनंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर संघटना आदींनी पाटील यांचा निषेध केला. याची दखल घेऊन  नांदेड ग्रामीण पोलिसांनी खासदार हेमंत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटीसह शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image