प्रधानमंत्र्यांनी सात राज्यातल्या ८ प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रगती- या आयसीटी आधारित बहु-आयामी सक्रिय प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणी प्लॅटफॉर्म अंतर्गत, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते खालील समितीने काल घेतला. एकूण ३१ हजार कोटी रुपये मूल्यांच्या आठ प्रकल्पांपैकी  चार प्रकल्प जल पुरवठा आणि सिंचनाशी संबंधित तर दोन प्रकल्प राष्ट्रीय महामार्गांचा विस्तार आणि इतर दोन प्रकल्प, रेल्वे आणि मेट्रो रेल्वे दळणवळणाशी संबंधित आहेत. हे आठही प्रकल्प  महाराष्ट्र, बिहार, झारखंड, हरियाणा, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि गुजरात या राज्यांशी संबंधित आहेत.

उपग्रह प्रतिमांसारख्या तंत्रज्ञानाचा  उपयोग करत, प्रधानमंत्री  गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन पोर्टल प्रकल्पांसाठी स्थान आणि जमिनीच्या आवश्यकतांशी संबंधित अंमलबजावणी आणि नियोजनाच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात मदत होऊ शकेल, यावर मोदी यांनी भर दिला.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image