जनसामान्यांच्या समस्या आणि अडचणी समजून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं, तसंच संघटित होऊन एकत्र येण्याचं दिलीप वळसे पाटील यांचं आवाहन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : जनसामान्यांच्या समस्या आणि अडचणी समजून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं, तसंच संघटित होऊन एकत्र येण्याचं आवाहन राज्याचे सहकार मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. अकोला इथं राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते काल बोलत होते.

पक्ष संघटना मजबूत करून प्रत्येक प्रभागासाठी कार्यकर्त्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची सूचनाही त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केलं आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत प्रामाणिक आहोत त्यामुळे भूतकाळात न जाता अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षाला बळ देण्याचे काम करावं असं सहकार मंत्री वळसे पाटील यांनी सांगितलं.