२० ते ३० वयोगटातल्या युवकांमध्ये वाढत असलेल्या हृदयविकाराबद्दल राज्यपालांकडून चिंता व्यक्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : देशातल्या २० ते ३० वयोगटातल्या युवकांमध्ये वाढत असलेलं हृदयविकाराबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी चिंता व्यक्त केली आहे. हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी हृदयविकार तज्ञांनी मार्गदर्शन करावं असं आवाहन त्यांनी केलं. 'कार्डियाक इमेजिंग आणि क्लिनिकल कार्डिओलॉजी' या विषयावरच्या तिसऱ्या जागतिक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी काल ते मुंबईत बोलत होते.

इमेजिंग सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी लागणारी आधुनिक वैद्यकीय उपकरणे देशात तयार झाली तर इमेजिंग चाचण्यांचा खर्च कमी होईल, असं ते म्हणाले. हृदयरोग आणि  त्यासाठी लागणारा रोगनिदान खर्च आयुष्मान भारत सारख्या योजनेतून मिळाला तर त्याचा गरीब कुटुंबांना मोठा फायदा होईल असंही राज्यपाल म्हणाले.