नेपाळमध्ये झालेल्या दोन भूकंपांमुळे राजधानी दिल्लीसह देशाच्या उत्तर भागाला मोठे हादरे

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नेपाळमध्ये आज झालेल्या दोन भूकंपांमुळे राजधानी दिल्लीसह देशाच्या उत्तर भागाला मोठे हादरे बसले. या भूकंपांची  तीव्रता ४ पूर्णांक ६ दशांश आणि ६ पूर्णांक २ दशांश रिश्टर स्केल इतकी होती. त्याचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये जमिनीखाली ५ किलोमीटरवर होता अशी माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिली. यापैकी पहिला भूकंप आज दुपारी सव्वा दोन वाजता, आणि दुसरा भूकंप दुपारी २ वाजून ५१ मिनिटांनी झाला. यामध्ये कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही.