दिवाळीनिमित्त दिल्या जाणाऱ्या आनंदाच्या शिध्यामध्ये मैदा आणि पोह्याचाही समावेश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शिधापत्रिकाधारकांना या वर्षी दिवाळीनिमित्त शंभर रुपयात ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. आनंदाचा शिधा या संचात पूर्वी, रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्य तेल असे ४ जिन्नस होते.

आता यामध्ये मैदा आणि पोहे हे दोन नवीन जिन्नसही दिले जाणार आहेत.विदर्भ आणि मराठवाड्यातील उच्चदाब वितरण प्रणाली योजनेला मंत्रिमंडळानं मुदतवाढ दिली, तसंच या विभागातील कृषिपंप वीज जोडण्या वेगानं पूर्ण करण्याचाही निर्णय घेण्यात आला. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरता परदेशी शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी १० कोटी ८० लाख रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा  आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.  कृषी विभाग तसंच  मदत आणि  पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिले.

Popular posts
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय
Image
डीआरडीओने विकसित केलेल्या स्वदेशी अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राच्या (रूद्रम) उड्डाणाची चाचणी यशस्वी
Image
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदच्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती, भक्ती शक्ती शिल्प निगडी येथे मोठ्या उत्साहात साजरी
Image
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन
Image