रिझर्व्ह बँकेनं नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना केला रद्द

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रिझर्व्ह बँकेनं नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना कालपासून रद्द केला आहे. अपुरं भांडवल आणि उत्पन्नात वाढीची शक्यता नसल्याचं तसंच विविध तरतुदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी बँकेनं ही कारवाई केली. त्यानंतर सर्व व्यवहार थांबवण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं नगर अर्बन बँकेला काल दिले. सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधकांना या बँकेवर अवसायक नेमण्याची विनंती RBI नं केली आहे. बँकेच्या ९५ टक्क्यांहून अधिक खातेदारांना DICGC कडून सर्व ठेवी परत मिळतील. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image