राज्यभरातून आलेल्या ४१४ कलशांचं मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर पूजन

 



मुंबई (वृत्तसंस्था) : मेरी माटी मेरा देश हा देशासाठी शहीद होणाऱ्या वीरांच्या त्यागाला, बलिदानाला नमन करण्याची संधी देणारा कार्यक्रम असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. राज्यभरातून आलेल्या ४१४ कलशांचं पूजन मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर केल्यावर ते बोलत होते. केवळ पायाभूत सुविधा, इमारती, मोठे प्रकल्प, भौतिक सुविधाच महत्वाच्या नाहीत, तर त्याचबरोबर आपल्या मातृभूमीविषयीचं प्रेम, संस्कृतीविषयी आदर तितकाच महत्त्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं.राज्यभरातून गोळा केलेले हे कलश घेऊन ९०० स्वयंसेवक थोड्या वेळापूर्वी विशेष रेल्वेनं नवी दिल्लीला रवाना झाले.