जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवी मंदिराला आतापर्यंत ८० लाखांहून अधिक भाविकांची भेट

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यावर्षी जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवी मंदिराला आतापर्यंत ८० लाखांहून अधिक भाविकांनी भेट दिली. ही संख्या १ कोटींपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. ११ वर्षांनंतरपहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येनं भाविकांनी माता वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं आहे. दरम्यान, नवरात्र उत्सवात मंदिर परिसरातल्या चार मोठ्या विकास प्रकल्पांचाप्रारंभ करण्यात आला.