खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करायला मंत्रिमंडळाची मंजुरी

 



मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करायला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना २ हेक्टरऐवजी ३ हेक्टर मर्यादेत मदत करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला. त्याचप्रमाणे शेत जमिनीच्या नुकसानीसाठी २ हेक्टर मर्यादेत केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणारी मदत आता अल्पभूधारक शेतकरी नसलेल्यांनाही मिळेल.