आशियाई पॅरा क्रीडास्पर्धांमध्ये भारताची ७० पदकांची कमाई

 

Uploading: 753660 of 753660 bytes uploaded.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये हाँगझू इथं सुरु असलेल्या आशियाई पॅरा क्रीडास्पर्धांमध्ये भारताने १७ सुवर्ण, २१ रौप्य आणि ३२ कांस्य अशी ७० पदकं आतापर्यंत पटकावली आहेत. नेमबाजीच्या R6 - संमिश्र प्रकारात बाबू सिद्धार्थने सुवर्णपदक मिळवलं. गोळाफेकीच्या F-46 प्रकारात सचिन खिलारीने सुवर्ण तर रोहित कुमारने कांस्य पदक जिंकलं. महिलांच्या F-34 या भालाफेक प्रकारात भाग्यश्री जाधवनं रौप्य पदक पटकावलं. पुरुष T35 या धावण्याच्या शर्यतीत नारायण ठाकूरने कांस्य पदक मिळवून आजच्या दिवसांची सुरवात केली. T37 प्रकारात श्रेयांश तिवारीनेही कांस्य मिळवलं. लॉन टेनिस, धावणे, तिरंदाजी, नेमबाजी, बॅडमिंटन, बुद्धीबळ, सायकलिंग अशा अनेक क्रीडाप्रकारांमध्ये भारतीय खेळाडू आपलं कौशल्य आज अजमावणार आहेत.