ललित पाटीलला सोनं विकणाऱ्या सराफाला अटक

 


मुंबई (वृत्तसंस्था) : अंमलीपदार्थ प्रकरणी अटकेत असलेल्या ललित पाटील याला सोनं विकणाऱ्या सराफाला नाशिक पोलिसांनी आज अटक केली. रेणुका ज्वेलर्सचा संचालक अभिजीत दुसानेला अटक केल्यावर पोलिस त्याला घेऊन पोलीस पुण्याकडे रवाना झालेत. पाटील आणि त्याच्या भावानं खरेदी केलेल्या जमिनींची माहिती मिळावी यासाठी पोलिसांनी मुद्रांक शुल्क विभागाला पत्र लिहिलं आहे, असं वृत्तसंस्थेनं कळवलं आहे.