राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. चंद्रगौडा पाटील यांची ‘दिलखुलास’ मध्ये २७ व २८ ऑक्टोबरला मुलाखत

 


मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त धुळे जिल्ह्यातील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च विभाग (फार्माकोलॉजी विभाग) प्रमुख प्रा. डॉ. चंद्रगौडा रावसाहेब पाटील यांची मुलाखत प्रसारित करण्यात होणार आहे.

शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येते. यामध्ये विद्यार्थ्यांना स्वत:च्या गतीने क्लिष्ट विषयाचे अवलोकन करता यावे यासाठी मागील दोन दशकांपासून नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण उपकरणे, शैक्षणिक साहित्य व शिक्षण पद्धती विकसित करण्यासाठी डॉ. पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.  त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन प्रा. डॉ. पाटील यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या निमित्ताने प्रा. डॉ. पाटील यांनी आपल्या वाटचालीबद्दल, शैक्षणिक क्षेत्रातील संशोधन व योगदानाबद्दल ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शुक्रवार दि. 27 आणि शनिवार दि. 28 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. प्रा. दिपश्री मालखेडे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
मुंबईतील किल्ल्यांच्या विकास शासकीय निधीबरोबरच बाह्यस्त्रोताद्वारे राबविण्याचे नियोजन करावे – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image