रेशन वितरणातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पश्चिम बंगालचे मंत्री ज्योती प्रिया मल्लिक यांना ईडीची अटक

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयाने पश्चिम बंगालच्या मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांना कथित रेशन वितरणातल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात काल रात्री अटक केली. ते सध्या पश्चिम बंगालचे वनमंत्री आहेत. अटकेपूर्वी  ईडीने त्यांची २० तासांहून अधिक काळ चौकशी केली. तसंच कोलकाता इथल्या त्यांच्या वडिलोपार्जित घराची झडती घेतली. त्यानंतर त्यांना सॉल्ट लेक इथं ईडी कार्यालयात आणण्यात आलं. त्यांना आज बँकशाल न्यायालयात हजर करण्यात आलं. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे पीए अमित डे यांच्या फ्लॅटची आणि त्यांच्या दोन जवळच्या साथीदारांचीही झडती घेतली.