मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं होणार अनावरण

 


मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उद्या भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होत आहे. या पुतळ्याची निर्मिती अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी केली आहे. २२ फुट उंचीचा हा पुतळा असून सचिनच्या हातातील बॅट चार फूट लांबीची आहे. सचिनचं हे शिल्प एका ग्लोबवर उभारण्यात आलं आहे. या ग्लोबवर जगाचा नकाशा आहे. ऑस्ट्रेलियाचा दिवंगत  गोलंदाज फिरकीपटू शेन वॉर्न यांच्या चेंडूवर सचिननं षटकार ठोकला तो क्षण या पुतळ्याच्या रूपानं कायम स्मरणात राहणार आहे.