हवामान बदलाच्या आव्हानांकडे तातडीनं लक्ष पुरवणं गरजेचं असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तापमानातली वाढ ,समुद्र पातळीतली वृद्धी यासह हवामान बदलाच्या आव्हानांकडे तातडीनं लक्ष पुरवणं गरजेचं असल्याचं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केलं आहे. चेन्नईतल्या भारतीय सागरी विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभात त्या बोलत होत्या. देशाच्या व्यापारापैकी ९५ टक्के व्यापार आणि एकूण उलाढालीच्या ६५ टक्के उलाढाल सागरी वाहतुकीच्या माध्यमातून होत असते त्यामुळे भारतीय व्यापार आणि आर्थिक वाढीत सामुद्रिक क्षेत्रांची महत्वाची भूमिका असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. यावेळी १ हजार ९४४ यशस्वी विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदवी आणि पदव्युत्तर पदवी देण्यात आली तर उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदकानं गौरवण्यात आलं.