भारतीय वंशाच्या दोन वैज्ञानिकांना अमेरिकेचे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वंशाच्या दोन वैज्ञानिकांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या हस्ते काल राष्ट्रीय तंत्रज्ञान आणि नवोन्मेष पदकाने सन्मानित करण्यात आलं. अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये पुरस्कार सोहळ्यात अशोक गाडगीळ आणि सुब्रा सुरेश यांना राष्ट्रीय तंत्रज्ञान आणि नवोन्मेष पदक तसंच राष्ट्रीय विज्ञान पदकाने सन्मानित केलं. यावेळी बायडन यांनी अमेरिकी शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि नवोन्मेषकांचाही सत्कार केला. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या अमेरिकी नागरिकांना हे पुरस्कार दिले जातात.