आकाशवाणी पुणे केंद्राच्या स्थापनेला 70 वर्षे पूर्ण

 

पुणे : पुणे आकाशवाणी केंद्रामध्येही काल राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना अभिवादन करून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. एक ऑक्टोबरलाही सकाळी श्रमदानाद्वारे स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छता शपथ घेण्यात आली. काल आकाशवाणी पुणे केंद्राच्या स्थापनेला 70 वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर अधिकारी कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त केलं; त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आलं. फॉरेंजर्स या स्वयंसेवी समूहाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सहकार्य केलं. आकाशवाणीतील सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.