नवी दिल्लीतील G-20 शिखर परिषदेत, सध्याच्या ज्वलंत प्रश्नांशी नातं असलेल्या संकल्पना, चर्चा, कृती, तोडगे, आणि फलनिष्पतींमुळे ही परिषद संस्मरणीय ठरेल - एस. जयशंकर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नवी दिल्ली इथं आयोजित १८ व्या जी -20 शिखर परिषदेत, सध्याच्या ज्वलंत प्रश्नांशी नातं असलेल्या संकल्पना, चर्चा, कृती, तोडगे, आणि फलनिष्पतींमुळे ही परिषद संस्मरणीय ठरेल, असं  परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते आज नवी दिल्लीत बोलत होते. रशिया आणि चीनचे अध्यक्ष या शिखर परिषदेला उपस्थित राहणार नसल्याच्या वृत्ताबाबत प्रश्न विचारला असता, जयशंकर म्हणाले की, कोणता देश कधी येणार यापेक्षा आल्यावर तो कोणती भूमिका घेणार, हा खरा मुद्दा असून त्यावर लक्ष दिलं पाहिजे. भारताच्या जी -20 अध्यक्षपदाच्या काळात आफ्रिकी संघाला जी -20 समुहात सहभागी करुन घेण्याबाबत विचारलं असता, या शिखर परिषदेत ते घडू नये, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.