मेरी माटी मेरा देश”या मोहिमेचा पहिला टप्पा मोठ्या प्रमाणावर लोकसहभागाचा साक्षीदार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मेरी माटी मेरा देश”या मोहिमेचा पहिला टप्पा मोठ्या प्रमाणावर लोकसहभागाचा साक्षीदार ठरला आहे. आतापर्यंत ३६ राज्ये तसंच केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्वातंत्र्य सैनिक आणि सुरक्षा दलांना समर्पित केलेले  सुमारे अडीच लाखांहून अधिक शिलाफलक बांधले गेले आहेत. या मोहिमेअंतर्गत वेबसाइटवर आतापर्यंत जवळपास ४ कोटी पंचप्राण प्रतिज्ञा सेल्फी अपलोड करण्यात आल्या आहेत. २ लाखांहून अधिक वीरांच्या सत्कार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं आहे. वसुधा वंदन या संकल्पने अंतर्गत २ कोटी ३६ लाखापेक्षा जास्त देशी रोपे लावण्यात आली असून २ लाख ६३ हजार  अमृत वाटिका  तयार करण्यात आल्या आहेत. संपूर्ण भारतातल्या ६ लाख खेड्यांमधून आणि शहरी भागातून  माती आणि तांदूळ गोळा केले जात आहे. ग्रामीण आणि  शहरी भागातल्या माती चे हे अमृत कलश  एकत्र करून मंडळ-स्तरीय कलश तयार केले जातील. ऑक्टोबरच्या अखेरीस साडे आठ हजाराहून अधिक कलश दिल्लीत दाखल होतील अशी अपेक्षा आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून गोळा केलेली माती अमृत वाटिका आणि अमृत स्मारकात ठेवली जाईल,ज्यामुळे आझादी का अमृत महोत्सवाचा वारसा निर्माण होईल.