कॅनरा बँकेच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कॅनरा बँकेच्या ५३८ कोटी रुपयांच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज गोयल यांच्या कोठडीची मागणी केली नाही.  आपल्याला तळोजा कारागृहात पाठवू नये, यासाठी गोयल यांनी केलेली विनंती काळा पैसा प्रतिबंधक विशेष PMLA न्यायालयानं मान्य केली असून, आता त्यांची रवानगी आर्थर रोड इथल्या कच्च्या कैद्यांच्या कारागृहात होणार आहे. गोयल यांना ईडी नं १ सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्यांच्या ईडी कोठडीची कालावधी आज संपला.