अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन ७ ते १० सप्टेंबरदरम्यान भारत दौऱ्यावर येणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जी २० परिषदेनिमित्त भारत भेटीसाठी उत्सुक असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ७ ते १० सप्टेंबरदरम्यान ते भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते द्विपक्षीय चर्चाही करतील.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग या परिषदेला उपस्थित राहणार नसल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. जिनपिंग यांची अनुपस्थिती दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया बायडेन यांनी दिली आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथोनी अल्बानीस, जर्मनीच्या चान्सलर ओल्फ शूल्झ, ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक, जपानचे प्रधानमंत्री फुमिओ किशिदा आणि ब्राझिलचे राष्ट्रपती लुई इनासिओ लुला डि सिल्वा भारतात ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या जी २० परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image