गरीबांचं कल्याण हे मोदी सरकारसाठी केवळ ब्रीदवाक्य नसून मंत्र आणि मोहीम आहे - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या सशक्तीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार, सातत्यानं काम करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल केलं. जैसलमेरमधल्या रामदेवरा इथं परिवर्तन संकल्प यात्रेच्या उद्घाटनावेळी राजनाथ सिंह बोलत होते. गरीबांचं कल्याण हे मोदी सरकारसाठी केवळ ब्रीदवाक्य नसून मंत्र आणि मोहीम असल्याचंही राजनाथ सिंह म्हणाले. भारत एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून उदयाला येत असून संपूर्ण जग त्याचं साक्षीदार आहे. आज जग भारताकडे विश्वासाच्या भावनेने पाहतं, असंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image