चांद्रयान ३ चं विक्रम लँडर आज पुन्हा यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरलं

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चांद्रयान ३ चं विक्रम लँडर आज पुन्हा यशस्वीरित्या अलगदपणे चंद्रावर उतरलं. या लँडरचं इंजिन आज पुन्हा प्रज्वलित झालं, त्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे ४० सेटींमीटर वरपर्यंत जाऊन या ठिकाणाहून ३०-४० सेटींमीटरच्या अंतरावर हे लँडर अलगदरित्या सुखरुप उतरलं. त्यानंतर यावरची सर्व उपकरणं नियमितपणे कार्यरत आहेत. चांद्रयान ३ मोहिमेत निश्चित उद्दिष्टांच्या पलीकडची ही कामगिरी आहे. यामुळं भविष्यात चंद्रावर पाठवलेलं यान पुन्हा पृथ्वीवर आणायला आणि मानवी मोहिम पाठवयाला मदत होणार आहे.