अभियंता दिनानिमित्त सर्व अभियंत्यांना प्रधानमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त सर्व अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या प्रगतीसाठी त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि समर्पण महत्त्वाचे असल्याचे प्नधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. ते म्हणाले की पायाभूत सुविधांपासून ते तांत्रिक प्रगतीपर्यंत, अभियंतांचे योगदान आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूला स्पर्श करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.अभियंता दिनानिमित्त, मोदीं यांनी दूरदर्शीपणासाठी सुपरिचित आणि प्रख्यात अभियंता, सर एम विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली.