अमेरिकेतनं आयात केलेल्या सफरचंदांवर ५० टक्के आणि अक्रोडवर १०० टक्के शुल्क कायम राहणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकेतनं आयात केलेल्या सफरचंदांवर ५० टक्के आणि अक्रोडवर १०० टक्के शुल्क कायम राहील. केवळ अतिरीक्त म्हणून लादण्यात आलेलं २० टक्के शुल्क माफ केल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. २०१९ मध्ये अमेरिकनं काही स्टील आणि अॅल्युमिनियम उत्पादनांवर शुल्क वाढ केली होती. त्यामुळं भारतानं हे अतिरीक्त शुल्क लादलं होतं. अमेरिकेनं आता भारतीय स्टील आणि अॅल्युमिनियम उत्पादनांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यानं अतिरीक्त शुल्क कमी केल्याचं गोयल म्हणाले. यामुळं देशातल्या सफरचंद, अक्रोड आणि बदाम उत्पादनावर विपरीत परिणाम होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.