उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील हायकोर्ट बार आसोसिएशच्या बार सभाकक्षाचे भूमिपूजन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील हायकोर्ट बार आसोसिएशच्या बार सभाकक्षाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. नागपूर उच्च न्यायालयाच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमास न्यायमूर्ती अतुल एस. चांदुरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी न्यायमूर्ती अनिल सांबरे, अविनाश घरोटे, अनिल किलोर, मुकालीका जवळकर, उर्मिला जोशी,  जी. ए. मेननाजीस, जी.ए. सानप, ए.एल. पानसरे, वृषाली जोशी, हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे उपस्थित होते.नागपूर खंडपीठातील विस्तारीत साऊथ विंग इथं बार असोसिएशनच्या सुमारे ८ हजार २२७ चौरस फुट टेरेसच्या जागेवर सभाकक्ष बांधण्यात येणार आहे. या बांधकामासाठी ३१७ लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. या कक्षामध्ये ५५ कर्मचारी बसण्याची व्यवस्था, माहिती कक्ष, प्रशस्त स्वतंत्र दालने त्यासोबत बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसाठी सार्वत्रिक आसन व्यवस्था राहणार आहे.