नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड मध्ये आता सर्वोच्च न्यायालयाचा अंतर्भाव होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड मध्ये आता सर्वोच्च न्यायालयाचा अंतर्भाव  होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी ही  माहिती दिली. यामुळे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित दिवाणी अथवा फौजदारी खटल्यांची माहिती मिळवणं सोपं होणार आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात ८० हजाराहून जास्त खटले प्रलंबित आहेत. डेटा ग्रीड च्या वेबपेज वर देशातल्या सर्व न्यायालयातली प्रलंबित तसंच निकाली निघालेल्या  प्रकरणांची संख्या सातत्यानं अद्ययावत होत राहणार आहे. आत्तापर्यंत यावर तालुका, जिल्हा आणि उच्च न्यायालयातील खटल्यांबाबतच माहिती मिळत असे. या नव्या निर्णयामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात पारदर्शकता येईल असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे.