स्मार्टअंतर्गत मूल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


पुणे : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील समुदाय आधारीत संस्थाकडून धान्य व फलोत्पादन पिकांच्या मूल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

समुदाय आधारीत संस्थेत शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचा महासंघ (फेडरेशन), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित प्रभाग संघ व महिला अर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्र यांचा समावेश आहे. समुदाय आधारीत संस्थेने अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना आदी माहिती https://www.smart-mh.org या संकेतस्थळारील सीबीओ टॅब मधील सीबीओ कॉर्नर या शीर्षकात उपलब्ध आहे.

इच्छुक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी संकेतस्थळावरुन डाऊनलोड केलेल्या अर्जाच्या नमुन्यात माहिती भरुन व आवश्यक कागदपत्र सोबत जोडून तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत जिल्हा प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, कृषी भवन, दुसरा मजला, शिवाजीनगर, पुणे यांच्या कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन स्मार्ट प्रकल्पाच्या जिल्हा अंमलबजावणी कक्षाच्या प्रमुखांनी केले आहे.