तिन्ही सेना दलांचं संयुक्त पथक बनविण्याचा प्रस्ताव असलेलं विधेयक आणि IIM कायद्यात सुधारणा करणारं लोकसभेत मंजूर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेत आज कामकाज सुरू झाल्यावर मणिपूरमधल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आंदोलन केलं. त्यामुळं दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब झालं होतं. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावरही गोंधळ कायम राहिल्यानं आणि राजस्थानातल्या महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या मुद्द्यावरुन राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेत मात्र थोडावेळ कामकाज झाल्यावर दुपारी सव्वा दोनच्या सुमारास कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेनं आज तिन्ही सेना दलांचं संयुक्त पथक बनविणारं आंतर-सेवा संघटना विधेयक मंजूर केलं. याविषयी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अधिक माहिती दिली.

IIM अर्थात भारतीय व्यवस्थापन संस्थांच्या कायद्यात सुधारणा सुचवणारं विधेयकही लोकसभेत आज मंजूर झालं. या विधेयकामुळं IIM ला राष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाच्या संस्थांचा दर्जा मिळणार आहे. तसंच राष्ट्रपती या संस्थांचे व्हिजिटर असतील आणि संचालकांची नियुक्ती बोर्ड ऑफ गव्हर्नर राष्ट्रपतींच्या परवानगीनं करेल. अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्था स्थापना विधेयकही लोकसभेत सादर करण्यात आलं. याशिवाय काही खासगी विधेयकं लोकसभेत सादर झाली. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image