दिवसागणिक बदलतं तंत्रज्ञान हे महसूल अधिकाऱ्यांसमोर खरं आव्हान असून, यावर मात करुन करदात्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी तत्परता दाखवण्याचं आवाहन - उपराष्ट्रपती


 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिवसागणिक बदलतं तंत्रज्ञान हे महसूल अधिकाऱ्यांसमोर खरं आव्हान असून, यावर मात करुन करदात्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी तत्परता दाखवण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल नागपूर इथं केलं. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत भारतीय महसूल सेवेच्या ७६ व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी प्रणिती या व्याख्यानमालेचं उद्घाटन उपराष्ट्रपती  धनखड यांच्या हस्ते झालं. त्यावेळी  ते बोलत होते.

प्रशिक्षणार्थीं महसूल अधिका-यांना समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या भावी भूमिकेसाठी  त्यांना सज्ज करण्यासाठी ‘प्रणिती’ या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस, उपराष्ट्रपतींच्या पत्नी डाॅक्टर सुदेश धनखड, केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता, मुख्य महासंचालक वसुंधरा सिन्हा उपस्थित होते.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image