ज्ञानवापी मशीद परिसरात सलग पाचव्या दिवशी भारतीय पुरातन सर्वेक्षण पथकाचं सर्वेक्षण कार्य सुरु

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज सलग पाचव्या दिवशी सुरक्षा व्यवस्थेत वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद परिसरात भारतीय पुरातन सर्वेक्षण पथकाचं सर्वेक्षण कार्य सुरु आहे. सकाळी ८ पासून सर्वेक्षणाचं काम सुरु झालं असून खासगी तळघराबरोबरच मशिदीच्या घुमटाचंही  सर्वेक्षण करण्यात येत आहे.