एनसीसीच्या काही विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणी एनसीसीच्या एका अन्य विद्यार्थ्याविरोधात तक्रार दाखल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ठाण्यात महाविद्यालयाच्या आवारात एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या काही विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी एनसीसीच्या एका अन्य विद्यार्थ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शारीरिक प्रशिक्षण सुरू असताना हा प्रकार घडल्याचं  पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणात पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विधानसभेत याबाबत मुद्दा मांडत आवश्यक ती पावलं उचलली जातील अशी माहिती दिली, तर एनसीसीनेही याबाबत एक निवेदन जारी करून हे एनसीसीच्या तत्त्वात तसंच प्रशिक्षणाच्या व्याख्येत बसत नाही अशी माहिती दिली आहे.