येत्या ६ महिन्यात कांदाटी खोऱ्यात बांबूपासून फर्निचर बनविण्याचा उद्योग सुरु करण्यात येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटन या दोन बाबींवर मुख्यत: लक्ष केंद्रीत करण्यात येत असून येत्या ६ महिन्यात कांदाटी खोऱ्यात बांबूपासून फर्निचर बनविण्याचा उद्योग सुरु करण्यात येईल.  त्याचबरेाबर पर्यटन वाढीलाही जिल्ह्यात चालना देण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.   

बांबू लागवड मिशन अंतर्गत सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यातल्या  दरे या गावी  बांबू लागवड आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन काल करण्यात आलं होतं.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी नंतर बांबू रोपट्यांचं वृक्षारोपण केलं. यावेळी राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, जिल्हाधिकारी ,मुख्य कार्यकारी अधिकारी , पोलीस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. या दौऱ्यात मेरी मिट्टी, मेरा देश या उपक्रमांतर्गत ग्रामंपचायत पिंपरी तांब इथं शिलाफलकाचं उद्घाटनही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं.