पुणे आयसिस प्रारूप प्रकरणी शमिल साकीब नाचन या संशयिताला अटक

 

मुंबई (वृत्तसंस्था) : दहशतवादी कारवायांना सहाय्य केल्याच्या आरोपाखाली एन आय ए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं शमिल साकीब नाचन या संशयिताला आज अटक केली. आयसिस या दहशतवादी संघटनेच्या कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली.  एन आय ए नं आजपर्यंत केलेली ही सहावी अटक आहे.

शमिल सकीब नाचन हा ठाणे जिल्ह्यातल्या पडघा इथला रहिवासी असून स्फोटक निर्मितीच  प्रशिक्षण देण्यात त्याचा सहभाग असल्याच आढळून आल्याचं एन आय ए ने म्हटलं आहे. एन आय ए ला त्याचा आतापर्यंत अटक केलेल्या अन्य पाच आरोपीसह इतरही काही संशयितांबरोबर संबंध असल्याचं संशय आहे. यातले दोन आरोपी सुफा दहशतवादी गटाशी संबंधित असल्याचंही आढळून आलं आहे.

या दहशतवाद्यांना राजस्थान इथं एप्रिल-२०२२ मध्ये कारमध्ये स्फोटकं आढळल्यावर फरार घोषित करण्यात आल होतं. ३ ऑगस्टला त्यांच्या चौकशी दरम्यान या आरोपींचा देशातल्या शांततेला तडे जाण्यासाठी दहशतवादी कारवाया करण्याचा उद्देश असल्याचं  एन आय ए पथकाला आढळून आल होतं.