तेजस या लढाऊ विमानाची स्वदेशी हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तेजस या लढाऊ हलक्या विमानानं गोव्याच्या किनाऱ्यावर अस्त्र या दृश्य व्याप्तीच्या पलिकडील स्वदेशी हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र यशस्वीपणे सोडले आहे. सुमारे २० हजार फूट उंचीवरून काल विमानातून क्षेपणास्त्र सोडण्यात यश आले. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, चाचणीचे सर्व उद्दिष्ट पूर्ण झाले आणि नियोजनानुसार ही चाचणी अचूक झाली.

अस्त्रची निर्मिती संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा, संशोधन केंद्र इमारत आणि DRDOच्या इतर प्रयोगशाळांनी डिझाइन आणि विकसित केले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, स्वदेशी बनावटीच्या तेजस फायटरकडून शस्त्राचा मारा करणे हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं एक मोठं पाऊल आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं की या प्रक्षेपणामुळे तेजसच्या लढाऊ क्षमतेत लक्षणीय वाढ होईल आणि आयात केलेल्या शस्त्रांवरील अवलंबित्व कमी होईल.