मराठा आणि धनगर समाजाला न्याय दिला नाही तर दोन्ही समाज येत्या काळात भाजपाला धडा शिकवेल - नाना पटोले

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सरकारनं मराठा आणि  धनगर समाजाला न्याय दिला नाही तर दोन्ही समाज येत्या काळात भाजपाला धडा शिकवेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. ते नाशिक दौऱ्यावर आले असतांना बातमीदारांशी  बोलत होते.

भाजपानं मराठा समाजाला गृहीत धरलं आहे. त्यामुळे मराठा त्या सोबत धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार टाळाटाळ करीत आहे. मात्र काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर या समाजाला नक्की न्याय देईल, असं ते म्हणाले.