रेराअंतर्गत १ लाखापेक्षा जास्त बांधकाम प्रकल्प आणि सुमारे ७८ हजार एजंट्सची नोंदणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रेरा अर्थात स्थावर मालमत्ता नियंत्रक प्राधिकरणा अंतर्गत १ लाखापेक्षा जास्त बांधकाम प्रकल्प आणि सुमारे ७८ हजार एजंट्स अर्थात अभिकर्त्यांनी नोंदणी केली आहे. केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री कौशल किशोर यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. ३२ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी रेरा स्थापन केलं आहे. तर २८ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्थावर मालमत्ता विषयक अपिलीय न्यायाधीकरणं स्थापन केली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.