विकासकामांच्या उभारणीतले अडथळे दूर व्हावे हे प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षाचे उद्दिष्ट

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या विकासकामांच्या उभारणीतले अडथळे दूर व्हावे या उद्देशानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्ष सुरु केल असून तो मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमला पूरक भूमिका बजावत आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाने स्पष्ट केलं आहे. दर १५ दिवसांनी या कक्षाच्या बैठकीत विकासकामांचा समग्र आढावा घेतला जातो, असं या पत्रकात म्हटलं आहे.