परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचं गुंतवणुकदारस्नेही धोरण - केंद्रीय अर्थमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं गुंतवणुकदारस्नेही धोरण आणलं आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सांगितलं. काही धोरणात्मक महत्त्वाची क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीसाठी खुली केली आहेत. २०२३-२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात भांडवल गुंतवणूक आराखड्यात वाढ केली आहे. बँकांची जलद वाढ व्हावी यादृष्टीनं पुनर्भांडवलीकरण, विलीनीकरण आणि त्यांच्या ताळेबंदांचं मजबुतीकरण केलं आहे, असं त्यांनी सांगितलं. २०२२-२३ मधे ४६ अब्ज ३ कोटी अमेरिकी डॉलर्सची थेट परदेशी समभाग गुंतवणूक, तसंच ७० अब्ज ९७ कोटी थेट परदेशी गुंतवणूक देशात आली, अशी माहिती सीतारामन यांनी दिली. 

Popular posts
जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक - उपराष्ट्रपती
Image
‘बार्टी’च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये रुजू
Image
तिसऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागरिकांना कुपोषण-मुक्त भारतासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आणि योगदान देण्याचे आवाहन
Image
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचं निधन
Image
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड
Image