प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकास आणि सुधारणांचा धडाका लावलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकास आणि सुधारणांचा धडाका लावलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अविश्वास ठरावावर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिली. 

काँग्रेसच्या ५५-६० वर्षांच्या कालखंडात जेवढी विकासकामे झाली नाहीत, त्यापेक्षा अधिक विकास गेल्या ९ वर्षांत झाला आहे असं म्हणत प्रधानमंत्री आणि एनडीएच्या घटक पक्षांचे स्थान या चर्चेनंतर अधिक बळकट होईल, यात मला तीळमात्र शंका वाटत नाही असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.