प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी १५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम

 

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचा लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी १५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली. या योजनेचा १४ वा हप्ता नुकताच वितरित करण्यात आला. यामध्ये राज्यातल्या ९७ लाख पात्र शेतकऱ्यांपैकी, ८५ लाख शेतकऱ्यांनाच प्रत्यक्षात लाभ मिळाला आहे. १२ लाख शेतकरी पात्र असूनही, भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसणं, ई-केवायसी नसणं तसंच बँक खात्याशी आधार संलग्न नसणं, या तीन कारणांनी वंचित राहिले आहेत. स्थानिक प्रशासनानं असे शेतकरी शोधून  तीनही अटींची पूर्तता करण्याचे निर्देश मुंडे यांनी दिले आहेत.