संपूर्ण देश मणिपूरसोबत असल्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संपूर्ण देश मणिपूरसोबत आहे, अशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना दिली. केंद्र आणि राज्य सरकार मणिपूरमधल्या गुन्हेगारांना योग्य ते शासन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मणिपूरमधला हिंसाचार हा दुःखद आहे, असं सांगत तिथं महिलांवर होणारे अत्याचार सहन केले जाणार नाहीत, असं प्रतिपादन त्यांनी केलं. मणिपूरमध्ये लवकरच शांतता पुनर्स्थापित होईल आणि राज्यात वेगानं विकास होईल, असा दावाही त्यांनी केला. ईशान्य भारतातल्या बहुतांश समस्यांना काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.