छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून युगांडाच्या प्रवाशाला अमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून अटक

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून महसूल गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी युगांडाच्या एका प्रवाशाला अमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून अटक केली आहे. त्याच्या शरीरातून ७८५ ग्रॅम कोकेन असलेल्या एकूण ६५ कॅप्सूल बाहेर काढल्या असून त्याची किंमत ७ कोटी ८५ लाख रुपये आहे. चौकशीदरम्यान त्याने भारतात तस्करी करण्यासाठी अमली पदार्थ असलेल्या कॅप्सूलचं सेवन करून आणि ते  शरीरातून वाहून नेत असल्याचं  कबूल केलं. त्याला  दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करून नंतर जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. 

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image