गौरी-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आनंदाचा शिधा लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्याचे छगन भुजबळ यांचे निर्देश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : गौरी-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आनंदाचा शिधा लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्याचे निर्देश राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. औरंगाबाद इथं भुजबळ यांच्या उपस्थितीत पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेल्या उसाचं साखर कारखान्यांमध्ये अचूक मोजमाप करण्यासाठी, संबंधीत संयंत्रात डिजीटल प्रणलीच्या उपयोगासह प्रमाणित संचालन कार्यप्रणालीची या हंगामापासून अंमलबजावणी करण्याचं भुजबळ यांनी यावेळी सूचित केलं.