महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त म्हणून रूपिंदर सिंग यांची नियुक्ती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तसेच मुख्य सचिव म्हणून रूपिंदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभारी निवासी आयुक्त नीवा जैन यांच्याकडून त्यांनी निवासी आयुक्त पदाचा पदभार सोमवारी स्वीकारला. रूपिंदर सिंग हे भारतीय प्रशासकीय सेवेतील १९९६ च्या महाराष्ट्र तुकडीचे अधिकारी असून निवासी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी, ते केंद्र शासनाच्या UIDAI अर्थात युनिक आयडेंटिफिकिशेन ॲथॉरिटी ऑफ इंडिया इथं उपमहासंचालक पदावर सात वर्ष कार्यरत होते.