परदेशात असताना मृत्यू झालेल्या भारतीयांचा मृतदेह भारतात लवकर परत आणण्यासाठीची सुविधा उपलब्ध करुन देणारं इकेअर पोर्टल कार्यान्वित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) परदेशात असताना मृत्यू झालेल्या भारतीयांचा मृतदेह लवकर भारतात परत आणण्यासाठीची सुविधा उपलब्ध करुन देणारं इकेअर पोर्टल आजपासून सुरू होईल. केंद्रिय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली. या पोर्टलच्या माध्यमातून केंद्रिय आंतरराष्ट्रीय आरोग्य विभाग, संबंधित अधिकारी, मृतदेह पाठवणाऱ्या व्यक्ती-संस्था आणि विमानवाहतूक कंपन्या यांना मृत्यूसंबंधीची सूचना इमेल, एसएमएस आणि व्हॉटसऍपद्वारे पाठवण्यात येईल. 48 तासांत ही माहिती तपासून अधिकारी मृतदेह भारतात पाठवण्यास मंजूरी देतील असं मांडवीय यांनी सांगितलं. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image