५० लाख टन गहू आणि २५ लाख टन तांदूळ खुल्या बाजारात विकण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किरकोळ बाजारातले दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं ५० लाख टन गहू आणि २५ लाख टन तांदूळ खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला आहे. खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचीव संजीव चोप्रा यांनी नवी दिल्ली इथं बातमिदारांना ही माहिती दिली. केंद्र सरकारला मिळालेल्या माहितीनुसार, गहू आणि तांदळाचे दर वाढवण्यासाठी काही व्यापारी  गहू आणि तांदळाचा अवैधरित्या साठा करत आहेत. मात्र देशात गहू आणि तांदळाचा पुरेसा साठा आहे, असंही चोप्रा यांनी सांगितलं.