राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालिन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शिक्षण विभागात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून ४४ जणांकडून पाच कोटी रुपये घेतल्या प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालिन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दराडेंसह त्यांचा भाऊ रामचंद्र दराडे यांच्याविरुद्ध फेब्रुवारी महिन्यातच गुन्हा दाखल करण्यात आला होता.