इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या जगातल्या पहिल्या मोटारीचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्ली इथं १०० टक्के इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या जगातल्या पहिल्या गाडीचं अनावरण केलं. जगातलं पाहिलं फ्लेक्स-इंधनावर चालणारं विजेचं वाहन सुरु करून देशानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवल्याचं ते यावेळी म्हणाले. देशाची तेल आयात सध्या १६ लाख कोटी रुपये इतकी असून, भारताला स्वावलंबी देश बनवण्यासाठी तेलाची आयात शून्यावर यायला हवी, असं ते म्हणाले.  देशातल्या एकूण प्रदूषणापैकी ४० टक्के वाटा केवळ वाहतूक क्षेत्राचा असून, ही मोठी चिंतेची बाब आहे. प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी आपण अधिक शाश्वत उपाययोजना करायला हव्यात असं ते म्हणाले. पेट्रोल आणि इथेनॉलच्या मिश्रणामुळे देशाच्या कृषी क्षेत्राचा विकास १२ टक्क्यावरून २० टक्के इतका वाढेल, आणि त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील असं गडकरी म्हणाले.  २० टक्के इथेनॉल मिश्रणाच्या अंमलबजावणीमुळे भारताच्या आयातीच्या खर्चात  वर्षाला ३५ हजार कोटी रुपयांची बचत होईल, असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी यावेळी सांगितलं. 

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image